Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

वेळेचे व्यवस्थापन | Time By Aditi Bhave

वेळेचे व्यवस्थापन | Time By Aditi Bhave

Regular price Rs. 112.50
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 112.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

वेळ व्यवस्थापन म्हणजे तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक वेळेचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होय. याचा अर्थ केवळ तुमच्या तातडीच्या कामांनाच नव्हे तर महत्त्वाच्या गोष्टींनाही प्राधान्य देणे. तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन प्लॅनर आणि करायच्या कामांची यादी वापरू शकता. ही साधनं निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु ती महत्त्वाची कामे आणि तातडीची कामं कोणती यातला फरक स्पष्ट करत नाहीत. महत्त्वाच्या उपक्रमांचा एक परिणाम असतो ज्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य होतात.

तातडीच्या उपक्रमांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असते. आणि बर्याचदा ते उपक्रम इतरांची उद्दिष्टे पूर्ण करण्याशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, की विलंब हा प्रभावी वेळ व्यवस्थापनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. गोष्टी लांबवल्याने किंवा टाळल्याने, तुमच्या कामाचा ढीग होत राहील/तुमचे काम साचून राहील. प्रभावी वेळ व्यवस्थापनामुळे तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात.

- प्राधान्यक्रम ठरवून, तुम्ही वेळखाऊ आणि अनावश्यक उपक्रम वगळू शकता.

- एकाच वेळी अनेक कामं हाताळण्यापेक्षा तुम्ही दररोज असलेल्या कामाचे योग्य व्यवस्थापन करू शकता.

- तुमच्या कामांच्या दैनंदिन प्रगतीचं तुम्ही अवलोकन करू शकता.

या पुस्तकात ‘वेळ’ या मौल्यवान साधनाचा उपयोग आणि व्यवस्थापन अधिक चांगल्या रीतीने करण्याचे उपाय सांगितलेले आहेत.

View full details