About Us
दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. ही साहित्य विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली अशी ख्यातनाम प्रकाशन संस्था आहे. या संस्थेची स्थापना प्रा. द. के. बर्वे यांनी १९७१ मध्ये, ५० पैसे किंमत असलेल्या १५ पानी ‘छान छान नाटुकली’ या पुस्तकाचे प्रकाशन करून केली.
आज आम्ही २५०० पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि हा या क्षेत्रातला एक विक्रमच असेल! बालसाहित्याबरोबरच आम्ही मोठ्यांसाठीचे कथासंग्रह, काव्यसंग्रह, समीक्षा, चरित्रे, विज्ञानकथा आणि सर्व प्रकारचे विचार प्रवर्तक आणि माहितीपूर्ण साहित्य छापतो. फक्त उच्च अभिरूची असलेले, संस्कृतीचे संवर्धन करणारे आणि निखळ मनोरंजन करणारे गुणवत्तापूर्ण साहित्यच छापणे हा आमचा बाणा आहे. लोकप्रिय, प्रस्थापित लेखकांबरोबरच नवोदितांनाही आमच्या ख्यातनाम संस्थेमार्फत पुस्तके छापण्याची संधी प्राप्त होते.
दर्जेदार छपाई, बहुरंगी मुखपृष्ठ, रास्त किंमत आणि मराठी भाषिक लोक असलेल्या जगाच्या सर्व काना-कोपऱ्यात वितरण ही दिलीपराज प्रकाशनची काही ठळक वैशिष्ट्ये! छपाईची गुणवत्ता राखली जावी आणि पुस्तके वेळेवर पूर्ण व्हावी म्हणून आम्ही नुकताच स्वतःचा प्रेस सुरु केला आहे.
दिलीपराज प्रकाशनला भारताचे सन्माननीय राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००२ मध्ये, विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
आमच्या यशोगाथेमधला अजून एक मानाचा तुरा म्हणजे आम्ही प्रकाशित केलेल्या १०५ पुस्तकांना राज्य पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील ही बक्षिसे आणि आमच्या असंख्य वाचकांचे प्रेम व कौतुक यामुळे आम्हाला सक्रिय मार्गक्रमण करण्यास सदैव प्रोत्साहन मिळते.