Skip to content

Get Flat 25% Off On New Released Books

Free Shipping On All Orders!!!

Know Our Founder

प्रा. द. के. बर्वे (त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो) यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी बेळगाव येथे झाला. बी. ए. व एम. ए.चे त्यांचे शिक्षण मराठी प्रमुख विषय घेऊन फग्र्युसन महाविद्यालयात व पुणे विद्यापीठात झाले. बी. एड. बेळगाव इथून शिक्षण महाविद्यालयातून केले. न्यू इंग्लिश स्वूâल नानावाडा आणि नंतर टिळक रोड या शाळेत त्यांनी मराठीचे नामवंत शिक्षक म्हणून नाव कमावले. त्यानंतर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमधून उस्मानाबाद, तासगाव व कोल्हापूर इथे त्यांनी मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. या सर्व शिक्षकी पेशामध्ये त्यांना मानणारा मोठा विद्यार्थिवर्ग आजही स्मरणाने त्यांचे ऋण व्यक्त करतो.

मराठीवर त्यांचे जिवापाड प्रेम आणि तेवढेच प्रभुत्वही. बेळगावच्या सुप्रसिद्ध सरदार हायस्वूलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाल्यामुळे त्यांचे इंग्रजीही उत्तम होते, त्याची साक्ष वोरा आणि वंâपनीने त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून कुमारांसाठी करून घेतलेल्या कादंबरिकांवरून येईल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘निवडक नवनीत’ व वामन मल्हारांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’ ही पुस्तके लिहिली. त्या वेळचे सुप्रसिद्ध व्हिनस प्रकाशनचे स. कृ. पाध्ये यांनी ती छापली आणि बर्वे यांनी अधिक समीक्षालेखन करावे, असे सुचवले; पण त्यांचा खर पिंड सर्जनशील लेखकाचा होता.

सन १९५० मध्ये आंबटषौक हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. माझ्या लहानपणी वाचलेली त्यांची किती तरी सुंदर पुस्तके, कथा-कादंबरिका आजही माझ्या स्मरणात आहेत आणि आजच्या पिढीला ही पुस्तके उपलब्ध नाहीत याचे शल्यही मनात आहे. गुलछबू, पुâलराणी, गोड गुपित, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, किती वाजले, नन्नी, छबुकड्या गोष्टी, डॉक्टर पोटफोडे— अशी किती तरी वाचनीय आणि गुंतवून ठेवणारी पुस्तके आम्ही त्या काळात आवडीने वाचत होतो. त्यातली काही पुस्तके समर्थ प्रकाशन— वा. रा. ढवळे यांनी काढली, तर नंतर भाऊंनी स्वत:च्या सुरू केलेल्या दिलीपकुमार प्रकाशनाने काही पुस्तके काढली.

महाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी काही पुस्तके लिहून घेण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांचे एक निवासी शिबिर भोर येथे भरवले होते. त्यात भाऊंनी लिहिलेले ‘गणूचा गाव’ हे पुस्तक महाराष्ट्रभर ग्रामीण भागात सर्वदूर पोचले. ही कादंबरी इतकी पकड घेणारी होती की, पुढे राष्ट्रीय स्तरावर लखनौ येथे भरलेल्या लेखक शिबिरातून त्यांची व प्रसिद्ध कादंबरीकार वि. वि. बोकील यांची निवड झाली.

सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाऊंनी पुण्यात प्रकाशनव्यवसाय सुरू केला. सन १९७१ मध्ये दिलीपराज प्रकाशन संस्थेची सुरुवात रविवार पेठेतील आमच्या राहत्या घरीच झाली. त्यांनी अगडबंब राक्षस, पिपातला राक्षस, माकडबाळ, चिव चिव चिमणी वगैरे लहान मुलांसाठी पुस्तके लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली, पण त्यात त्यांचा जीव आता रमेना. लेखनाची उर्मी, आयुष्यभरातले कडू-गोड अनुभव गाठीला आणि जात्याच असलेली प्रतिभा यांच्या जोरावर त्यांनी १९८०-८१ या दोन वर्षांत पुट्टी, पोकळी व पंचवेडी या तीन कादंबNया लिहिल्या. साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचे प्रकाशन समारंभही झाले.

बालपणापासूनचे त्यांचे जिवलग मित्र बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांचे चरित्र लिहिण्याचा घाट त्यांनी घातला आणि मुंबई, बेळगाव, पुणे अशा त्यांच्या वाNया सुरू झाल्या. हे चरित्र सर्वतोपरी उत्कृष्ट व्हावे, असा त्यांचा ध्यास होता. त्याचा ताण नकळतपणे त्यांच्यावर आला की काय नकळे, पण पुस्तक छापून होण्यापूर्वी केवळ दोन दिवस आधी २४ डिसेंबर १९८१ रोजी झोपेत हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दु:खद अंत झाला. दि. १२ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ ठरला होता, तो त्यांच्या आठवणी काढत पार पडला. रणजित देसार्इंनी त्या वेळी काढलेले भावोद्गार.

‘‘लेखक या नात्याने मी सांगू इच्छितो की, दत्तोपंतांनी अत्यंत सुंदर भावकाव्य निर्माण वेâले आहे. एक ज्येष्ठ ग्रंथकार मराठीत अवतरला आहे— रूपाने आणि गुणानेही!’’