Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

रणरागिणी | Ranragini

रणरागिणी | Ranragini

Regular price Rs. 154.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 154.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

लेखक : मिलिंद ढमढेरे

. आणि स्वप्न साकार झाले !
नवी मुंबई येथील दिनांक २ नोव्हेंबर २०२५ ची रात्र! डी. वाय. पाटील स्टेडियमवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांच्या नजरा दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नेदिनी डी क्लार्क हिने उंच मारलेल्या चेंडूकडे गेल्या. विजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने झपाटलेल्या हरमनप्रीत कौर हिने अप्रतिमपणे हा झेल घेतला तेव्हा स्टेडियमवर उपस्थित असलेल्या ६० हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. त्याला कारणही तसेच होते. भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न साकार केले.
क्रिकेटच्या इतिहासात भारतीय महिला संघाला मिळालेले हे पहिलेच विजेतेपद होते. यापूर्वी दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक, तर एकदा टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठूनही भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. आता मात्र घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवण्याची आलेली सुवर्णसंधी गमवायची नाही, याच ईर्षेने भारतीय महिला संघ या स्पर्धेत लढला आणि त्यांनी ऐतिहासिक विजय मिळविला.

View full details