1
/
of
1
Dilipraj Prakashan
लॉकडाऊन | Lockdown By sandhya Sathe Joshi
लॉकडाऊन | Lockdown By sandhya Sathe Joshi
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 210.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
कोकणातील ज्ञानयोगी आणि कर्मयोगी वडील, शहरातील ऐषाआरामी आयुष्य सोडून खेडेगावातील गरिबीचं व कष्टाचं आयुष्य स्वीकारून त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिलेली कर्मयोगी आई असा संपन्न वारसा लेखिकेला लाभला आहे. मालघरसारख्या खेड्यात राहून शिक्षणक्षेत्रात काम करताना निसर्गस्नेही रसरशीत आयुष्य लेखिका अनुभवते आहे. ते अनुभवत असताना आसपास दिसणाऱ्या माणसांचे अनेक नमुने तिच्यापुढे येत राहिले. त्यांच्यातील भावभावनांचे नेमके चित्रण लेखिका करते. त्यांचे समाधान, ईर्षा, वासना, विकार कसे आकार घेतात यांचे उत्तम चित्रण या कथांमधून आहे. याचबरोबर या माणसांचे अनेक कंगोरे कथांमधून उघडतात. ती माणसे पूर्ण सुष्ट वा पूर्ण दुष्ट नाहीत. त्यांच्या या कथा वाचताना 'अरे, ही माणसं तर आपल्या आजूबाजूची आहेत!' असे जाणवत राहते. उत्तम कथन हे या कथासंग्रहाचे बलस्थान आहे.
Share
