Skip to product information
1 of 2

Dilipraj Prakashan

क्रांतीचे चित्र आणि चरित्र-माओ | Krantiche Chitra Aani Charitra Mao By V.G. Kanitkar

क्रांतीचे चित्र आणि चरित्र-माओ | Krantiche Chitra Aani Charitra Mao By V.G. Kanitkar

Regular price Rs. 487.50
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 487.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

देशाचे दैन्य आणि सामाजिक विषमता, यांच्याविरूद्ध भारतातही लढा सुरू आहे. लोकशाही आणि साम्राज्यवाद यांच्या आधाराने संथपणे वाटचाल करू पाहणार्या राष्ट्रवादी शक्ती चीनमध्ये होत्याच! परंतु त्या साम्यवादापुढे पराभूत झाल्या आणि त्यातूनच आज हा मानवनिर्माल्य निर्माण झालेला आहे. जवळ जवळ सर्व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांत हा अनर्थ झालेला आहे, किंवा होऊ पाहत आहे. हा अनर्थ ज्यांना टाळावयाचा असेल, त्यांनी माओच्या क्रांतीचे चित्र आणि चरित्र समजून घेणे नितांत आवश्यक आहे. इतिहासाच्या सनावळ्यांत आणि बखरीत जे कालखंड बिचारे मूक आणि निर्वासित जीवन जगत असतात, त्यातूनच कुठल्या तरी नव्या पिढीच्या जीवनांना सह-संवेदना लाभून पुनर्जन्म मिळू शकतो. यासाठी हे कालखंड जीवंत करावे लागतात.

माणूस स्वार्थासाठी जेव्हा एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्याच्या वागण्यावर काही मर्यादा आपोआपच पडतात. परंतु एकदा का देशप्रेमाची, त्यागाची वगैरे भूमिका स्वीकारली की त्याच्या कृतीचे मूल्यमापन करणे अवघड होऊ लागते. राजकीय परिवर्तनात सामील झालेले ‘महात्मे’ हे बहुश: सर्वात जास्त हत्या करतात वा घडवतात! देशभक्त म्हणणारा मानव जेव्हा अहिंसक किंवा हिंसक हुकुमशहा होतो तेव्हा त्याच्या परिणामांना पारावार राहत नाही.

चालू शतकातील जीर्णशीर्ण चीनला नरकातून लाल तार्याकडे नेणारा, माओ हा असाच एक मानव आहे...!

View full details