Dilipraj Prakashan
इदं न मम | Idam Na Mam By Abhijit Joag
इदं न मम | Idam Na Mam By Abhijit Joag
Couldn't load pickup availability
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या अनेक तरुण स्वयंसेवकांनी ज्या जिद्दीने आणि समर्पण भावनेने ईशान्य भारतात परिवर्तन घडवले त्यांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी शब्दचित्र आहे. या पुस्तकामुळे अशीच जिद्द आणि समर्पण भावना भारतातील युवकांमध्ये निर्माण होईल आणि त्यांच्या प्रयत्नातूनच, मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पवित्र मातृभूमीला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल.
डॉ. मोहन भागवत,
सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
एक काळ असा होता जेंव्हा ईशान्य भारतातील फुटिरतावादाने धोकादायक पातळी गाठली होती. प्रेम, मैत्री, सेवा आणि विकास यांच्या मागनि या परिस्थितीत कसे परिवर्तन घडले ही एक विलक्षण कहाणी आहे, जी या प्रदेशाचा नागरीक या नात्याने मी स्वतः अनुभवली आहे. मला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकाद्वारे ही कहाणी संपूर्ण भारतात पोचेल आणि देशाभिमानाची भावना जागृत करेल.
किरण रिजीजू, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री
आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ झालेल्या निस्वार्थ वृत्तीचं दर्शन घडविणारं ‘इदं न मम’ (हे माझं नाही), हे त्यांना मार्ग दाखविणारं तत्त्वज्ञान होतं. आपलं कुटुंब आणि आरामशीर आयुष्य मागे सोडून अनोळखी जागी, अपरिचित लोकांमध्ये काम करायचं तर असाधारण आत्मशक्ती आणि बांधिलकी असावी लागते. त्यांचं दर्शन या पुस्तकाच्या पानापानांत घडतं.यातील अनुभव उद्बोधक आणि प्रेरणादायी आहेत. त्यातून हाच संदेश मिळतो की खरा बदल घडतो, तो अधिकारशाहीतून नव्हे तर संवेदनेतून; जबरीतून नव्हे तर सेवेतून. की खरा बदल घडतो, तो अधिकारशाहीतून नव्हे तर संवेदनेतून; जबरीतून नव्हे तर सेवेतून.
Share
