Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

डिटेक्टिव अल्फा आणि मृत्यूचे संदेश | Detective Alpha ani Mrutyuche Sandesh By SOURABH WAGALE

डिटेक्टिव अल्फा आणि मृत्यूचे संदेश | Detective Alpha ani Mrutyuche Sandesh By SOURABH WAGALE

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

सांगली शहरातील तळ्यापाशी एका वेड्याचा मृतदेह मिळाल्याची बातमी एके सकाळी पेपरात छापून आली. पोलीस तो मृत्यू म्हणजे एक वेडाच्या भरात केलेली आत्महत्त्या म्हणून सोडून द्यायच्या विचारात आहेत. पण दुसरीकडे अल्फाला तो एक खून असल्याचे पुरावे मिळतात आणि तो मृत्यूचा तपास सुरू करतो. जसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकतो, तसतसे त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे खून व्हायला लागतात. सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे खुनी प्रत्येक मृतदेहाजवळ एक तीन अक्षरी संकेत सोडतो, ज्यामुळे या मृत्यूचं रहस्य आणखीच वाढतं. हे सगळं कोण घडवून आणतंय? तळ्याजवळ मेलेल्या वेड्याला काहीतरी गुपित ठाऊक होतं हे नक्की. ते गुपित झाकण्यासाठीच ही खुनांची साखळी सुरू झाली होती. पण ते गुपित काय होतं? हा सगळा एखाद्या भयंकर कटाचा भाग आहे का? आणि त्या तीन अक्षरी संदेशाचं रहस्य काय आहे?

View full details