Dilipraj Prakashan
शिखण्डीनी | Shikandini By Ashwini Shenoy
शिखण्डीनी | Shikandini By Ashwini Shenoy
Couldn't load pickup availability
राजा द्रुपदाचं ज्येष्ठ अपत्य शिखंडिनी हिला लहानपणापासूनच योद्धा होण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ती रथी झाली, अतिरथी झाली. अतुल्य शौर्य आणि कुशल योद्धा असलेल्या तिने, शंभर कौरवांना एकटीने पराभूत केलं. आयुष्यभर तिने हस्तिनापूरच्या महारथी भीष्मांना ठार करण्याचं एकमेव ध्येय पूर्ण करण्यासाङ्गी प्रयत्न केले. पिढ्यान् पिढ्या चालू असलेलं सूडसत्र तिने संपवलं.
पण हेच तिचं अंतिम प्रारब्ध होतं का? कुरुक्षेत्राच्या युद्धात, जेव्हा पांडव बंधूंनी सर्व आशा गमावल्या होत्या आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार होता, तेव्हा शिखंडिनी त्यांच्यात सामील झाली आणि युद्ध त्यांच्या बाजूने वळवलं.
या युगातीत घटनांच्या पुन्हा सांगितलेल्या गोष्टींमध्ये, प्राचीन वैद्यकीय शास्त्रावर आधारित, शिखंडिनीच्या लिंग परिवर्तनाची ही कहाणी अनेक अर्थाने वास्तविक वाटते. या नवीन युगात, तृतीय लिंगाला स्वीकृती आणि नवी ओळख मिळत आहे. तेव्हा शिखंडिनीची कहाणी पुन्हा एकदा सगळ्यांनी जाणून घ्यावी अशीच आहे.
Share
