{"product_id":"rss-100-by-shyam-jaju-and-anupam-trivedi","title":"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @१०० | RSS @100 By Shyam Jaju and Anupam Trivedi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल म्हणजे केवळ एका संघटनेच्या प्रवासाची गाथा नाही, तर प्रसिद्धीपेक्षा धैर्य, वैयक्तिक आकर्षणापेक्षा अधिक चारित्र्य आणि प्रदर्शन, दिखाऊपणापेक्षा अधिक सेवेला प्राधान्य दिले अशा एका विचाराचा सशक्त प्रवाह आहे. गेल्या शंभर वर्षांपासून हे कार्य स्वयंसेवक आणि पुरोगामी विचारकांच्या माध्यमातून निरंतरपणे सुरू आहे. या मंडळींनी राष्ट्रनिर्माण या कार्याकडे एक घटना म्हणून नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभराची साधना म्हणून बघितले. समाज हा सत्ताप्राप्तीमुळे किंवा धोरणांमुळे नव्हे; तर जबाबदारी, उत्तरदायित्व, आत्मसंयम आणि आपापसातील सन्मानाने मजबूत होतो, या दृढ विश्वासाच्या बळावर स्वयंसेवकांच्या पिढ्यांनी आपली वाटचाल विश्वासाने सुरू ठेवली आहे. कायमस्वरूपी परिवर्तन हे आतून येते यावर संघाचा पूर्ण विश्वास आहे. समाजामध्ये हळूहळू छोट्या छोट्या आणि सातत्याने करत राहिलेल्या निःस्वार्थ कामांच्या माध्यमातून हे परिवर्तन घडून येते. आज भारत, नवनवीन संधी आणि अनेक आव्हानांच्या कसोट्या पार करत आपली आगेकूच करत आहे, तेव्हा या दृष्टिकोनाची संयुक्तिकता अधिक सुस्पष्ट होत आहे. संस्था बदलतात, परिस्थितीही बदलते, पण चारित्र्य, सामाजिक समरसता आणि आपल्या उद्देशांची आवश्यकता मात्र कायम राहते. याच चिरंतन सातत्यामध्ये संघाच्या शताब्दीचे महत्त्व अधोरेखित होत आहे आणि बहुधा पुढच्या शताब्दीची दिशाही !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68011572068717,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/RSS100.jpg?v=1794815781","url":"https:\/\/www.diliprajprakashan.in\/products\/rss-100-by-shyam-jaju-and-anupam-trivedi","provider":"Dilipraj Prakashan","version":"1.0","type":"link"}