{"product_id":"idam-na-mam-by-abhijit-joag","title":"इदं न मम | Idam Na Mam By Abhijit Joag","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या अनेक तरुण स्वयंसेवकांनी ज्या जिद्दीने आणि समर्पण भावनेने ईशान्य भारतात परिवर्तन घडवले त्यांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी शब्दचित्र आहे. या पुस्तकामुळे अशीच जिद्द आणि समर्पण भावना भारतातील युवकांमध्ये निर्माण होईल आणि त्यांच्या प्रयत्नातूनच, मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पवित्र मातृभूमीला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eडॉ. मोहन भागवत,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eएक काळ असा होता जेंव्हा ईशान्य भारतातील फुटिरतावादाने धोकादायक पातळी गाठली होती. प्रेम, मैत्री, सेवा आणि विकास यांच्या मागनि या परिस्थितीत कसे परिवर्तन घडले ही एक विलक्षण कहाणी आहे, जी या प्रदेशाचा नागरीक या नात्याने मी स्वतः अनुभवली आहे. मला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकाद्वारे ही कहाणी संपूर्ण भारतात पोचेल आणि देशाभिमानाची भावना जागृत करेल.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकिरण रिजीजू, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eशेकडो तरुण-तरुणींनी आपल्या घराची उब आणि नियमित आयुष्याची सुरक्षितता सोडून दिली आणि संयम, सेवा आणि समर्पण यांचा मार्ग स्वीकारला. त्यातले अनेकजण कधी घरी परतलेच नाहीत, त्यांनी आपले तारुण्य, आपली स्वप्ने आणि काही प्रसंगी आपला जीवही भारतमातेच्या वेदीवर समर्पित केला. आणि तरीही इतिहास त्यांना लक्षात ठेवायचं विसरुनच गेला. या आठवणी पुसून टाकणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक होतं. हा ढासळलेला नैतिक समतोल पुनस्र्थापित करायचं काम या पुस्तकाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि अधिकारवाणीने केलं आहे. हे पुस्तक कंठाळी प्रचार करत नाही तर अंतर्दृष्टी देतं. स्तुतीचे इमले उभारत नाही तर जाणिवा संपत्र करतं. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका ऋणातून उतराई होणं आहे. प्रत्येक भारतीयाने हा अनुभव घ्यायलाच हवा.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eविवेक अग्निहोत्री चित्रपट निर्माता व दिग्दर्शक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":53503352111469,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/IdaNaMama.jpg?v=1782971431","url":"https:\/\/www.diliprajprakashan.in\/products\/idam-na-mam-by-abhijit-joag","provider":"Dilipraj Prakashan","version":"1.0","type":"link"}